Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकल्याण : चार महिन्याचे बाळ हातातून निसटले, नाल्यात पडले

कल्याण : चार महिन्याचे बाळ हातातून निसटले, नाल्यात पडले

कल्याण : मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात पावसाने धुमाकूळ सुरू केला असून याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. त्यातच आता हृदय हेलावणारी दुर्घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल पावसामुळे ठाकुर्ली जवळ दोन स्थानकांमध्ये थांबलेली असताना दोन तास ताटकळलेले प्रवासी ट्रॅकच्या बाजूने चालत निघाले असताना एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ हातातून निसटले आणि रेल्वे रुळाखालील नाल्यात पडून वाहून गेले आहे.



बाळ वाहून जात असताना आईने हंबरडा फोडला, मात्र तातडीने सहप्रवासी व रेल्वे पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आहे.शर्थीचे प्रयत्न करून एका झुडपात अडकलेल्या बाळाची सुटका केली असल्याचे समजते.

त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून नाल्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेले. त्या बाळाचा शोध घेण्यात आला. अथक परिश्रमानंतर ते बाळ एका झुडपांमध्ये अडकलेले दिसले. शोधकर्त्यांचे सर्वांनी आभार मानले, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय