Saturday, May 18, 2024
Homeराज्यमोठी बातमी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी 

मोठी बातमी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी 

मुंबई, दि. १९ : राज्यात मुसळधार पाऊस होत आहे तर कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पुर आला आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशात काही जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आहे.

मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विधानभवन येथे प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारे आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबई व परिसरामध्ये मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय