महाड, पोलादपूर शहरात पुराचे पाणी शिरले
महाड : रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील महाड,पोलादपूर तालुक्यातील प्रमुख नद्यांना महापूर आला आहे. रायगड जिल्ह्यातील सहा प्रमुख नद्यांपैकी सावित्री आणि पाताळगंगा धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणात 4 ते 5 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाट व चिरेखिंडी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, आतापर्यंत 190 मिमी पाऊस पडला आहे.
दस्तुरी नाका ते नातेखिंड हा रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. भीमनगर, दस्तुरी नाका, गांधारी नाका या भागामध्ये गांधारी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपले सामान हलवण्यास सुरुवात केली आहे. सावित्री नदीतील पाणी भोईघाटामार्गे महाड शहरात शिरले आहे.सावित्रीची पातळी दुपारी दोन वाजेपर्यंत साडेसात मीटरपर्यंत गेल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. महाड शहरातील सुकट गल्लीत पाणी शिरले आहे.
हे ही वाचा :
उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा
ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर
ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून