Tuesday, May 14, 2024
Homeग्रामीणसंस्थात्मक विलिगीकरणाला स्थानिक ग्रामस्थांनी केला विरोध!

संस्थात्मक विलिगीकरणाला स्थानिक ग्रामस्थांनी केला विरोध!

नारायणगाव (२४ मे) :- वारुळवाडी शिवारातील आनंदवाड़ी,नंबरवाड़ी आणि ठाकरवाडी येथील ज़िल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलिगिकरण कक्ष प्रशासनाचे वतीने करण्यात आला. मात्र तेथे विलिगिकरण करणाऱ्या व्यक्तींंची माहिती वारुळवाडी ग्रामपंच्यायत सदस्यांना  व ग्रामस्थाना नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला..ग्रामस्थानी या बाबत आमदार अतुलदादा बेनके यांच्या पुढे  ग्रामपंचायती विरुद्ध तक्रारींचा पाड़ा वाचला. अखेर आमदार श्री बेनके यांनी मध्यस्थी केल्याने  ग्रामस्थ  शांत झाले.

       

तसेच ग्रामपंच्यातीकडून आरोग्यविषयक माहीती दीली जात नाही. ग्रामपंचायत प्रभागात निरजंतुकीकरण फवारणी केली जात नाही. कोरोना प्रादुर्भावा संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रबोधन केले जात नाही. ठाकर समाज अशिक्षित असल्याने त्यांचेपर्यंत ग्रामपंचयतीकडून कोणतीही माहिती पोहचविली जात नाही. संस्थात्मक विलिगीकरण केलेल्या व्यक्तीबाबत स्थानिक ग्रामस्थाना माहिती न दिल्याने ग्रामस्त संतप्त झाले. त्यांनी या बाबत ग्रामपंच्यायतीकडे विचारणा केली असता, ग्रामपंच्यायत प्राशासनाने उलट ग्रामस्थांना पोलीसांचे नावे धाक दाखविला.

“तुम्ही कोणीही घराच्या बाहेर पडल्यास संचारबंदी अदेशाचा भंग म्हणून गुन्हे दाखल करण्याची धमकी ग्रामपंच्यायत प्राशासनाने ग्रामस्थाना दिली. त्यामुळे संतापलेल्या शेकडो ग्रामस्थानी ग्रामपंचयतीत जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचयतीने संतप्त ग्रामस्तांची मानसिकता पाहून आमदार बेनके यांना पाचारण केले. ग्रामस्थाना विश्वासात घेतले तर सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थानी दिले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय