Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनाअंबाजोगाई शहरातील सिराज कॉलनी आणि सातपुते गल्लीच्या काही भागात कन्टेनमेंट झोन...

अंबाजोगाई शहरातील सिराज कॉलनी आणि सातपुते गल्लीच्या काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित, पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

(बीड/प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील  सिराज कॉलनी आणि सातपुते गल्ली येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळेे या दोन्ही ठिकाणच्या काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

       जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी अंबाजोगाई शहरातील  सिराज कॉलनी आणि सातपुते गल्ली येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था करणे आवश्यक आहे

       यामुळे सिराज कॉलनी येथील शेख अलाउद्दीन साहेब लाल यांचे घर ते प्रदीप अंबादास शेंडगे यांच्या घरापर्यंतचा परिसर तसेच,

 सातपुते गल्ली येथील चंद्रकांत माणिक माने यांचे घर ते अनिकेत बालाजी साबणे यांच्या घरा पर्यंतचा परिसर असा या दोन्ही ठिकाणच्या भागात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

 

       राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय