Tuesday, May 21, 2024
Homeशिक्षणशिक्षण क्षेत्रातील ५ महत्वाच्या बातम्या. वाचा सविस्तर.

शिक्षण क्षेत्रातील ५ महत्वाच्या बातम्या. वाचा सविस्तर.

१. ऑनलाइन शिक्षण घेत असाल तर अमेरिका सोडा : ट्रम्प

अमेरिकेतील ५० पैकी ४० राज्यात कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे तेथील काही विद्यापीठाने ऑनलाइन क्लासेस घेण्याचे ठरविले आहे. परंतु, ट्रम्प प्रशासन शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा आग्रह धरून आहे. यात ट्रम्प ने जे विदेशी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतील, त्यांनी आपल्या देशात जावं अस म्हंटल आहे. विद्यार्थी मात्र एवढी फीस भरल्यावर आपल्या देशात वापस येऊ शकत नाही.

२. CBSE चा पाठयक्रम ३० टाक्यांनी कमी; संघराज्य, नागरिकता, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता प्रकरण वगळले.

विद्यार्थ्यांवर पडणारे ताण कमी करण्यासाठी सीबीएसई ने शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ करीता शाळेचा अभ्यासक्रम ३० टक्यानी कमी केला आहे. तर राज्यशास्त्र विषयातील संघराज्य, नागरिकता, राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता या सारखी महत्वाची प्रकरण वगळण्यात आली आहेत. 

३. अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उदय सामंत यांचे केंद्र सरकारला पत्र; राज्य सरकार परीक्षा रद्द वर ठाम!

युजीसीच्या नव्या दिशा निर्देशानुसार प्रत्येक विद्यापीठाला सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत परीक्षा घेण्याचे अनिवार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व विद्यार्थ्यांची सुरक्षितता बघता राज्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

४. मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अप्लिकेशन (MCA) आता २ वर्षाचाच.

 २०२०-२१ सत्रापासून मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रम ३ वर्षाऐवजी २ वर्षांचा असेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मंगळवारी ही घोषणा केली. एआयसीटीईने सर्व उच्च शिक्षण संस्थांना अभ्यासक्रम कालावधीत बदल करण्यास सांगितले आहे.

५. #StudentLivesMatter काल दिवसभर ट्विटर ट्रेंड.

युजीसीने जाहीर केलेल्या नव्या दिशा निदर्शनाचा विरोधात काल दिवस भर ‘#StudentLivesMatter’, ‘Cancel-Exam2020’ ट्विटर ट्रेंड होतो. तर दुसरीकडे या निर्णयाची नोटिफिकेशन जाळून नवी दिली येथे भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटन(NSUI) नी विरोध दर्शविला. तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेने देखील निर्णयाला विरोध केला आहे. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने या निर्णयाच स्वागत केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय