Friday, May 10, 2024
Homeग्रामीणवसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन

(अंबाजोगाई/प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.

      महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. यावेळी अभिवादन प्रसंगी प्राचार्य किसन पवार,प्राचार्य प्रकाश जाधव, धोंडीराम राठोड,शाम जाधव पो.अ.राजाभाऊ राठोड, गणपत जाधव, बालासाहेब पवार, आण्णा राठोड, प्रा. संजय  राठोड, प्रा.सुनिल राठोड,श्री मधुकर राठोड, प्रा. उध्दव  चव्हाण आदी उस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय