Saturday, May 11, 2024
Homeराज्यइपीएस ९५ पेन्शनर्सचे देशभरात आत्मक्लेश आंदोलन; जगण्याइतकी पेन्शन देण्याची मागणी.

इपीएस ९५ पेन्शनर्सचे देशभरात आत्मक्लेश आंदोलन; जगण्याइतकी पेन्शन देण्याची मागणी.

नाशिक (प्रतिनिधी) :  ई.पी.एफ९५ पेन्शनर फेडरेशन वतीने आत्मक्लेश आंदोलन करत जगण्याइतकी पेन्शन देण्याची मागणी आज देेशभरात करण्यात आली.

केंद्र सरकार ९५ पेंन्शनरांना फसवत आहे, हायकोर्ट, सुप्रिमकोर्टाचे आदेश असून देखील पेंन्शनरांच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारने क्रुर चेष्टा चालवली असल्याचे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष राजू देसले म्हणाले.

सोशल मिडीयावर, वर्तमान पत्राव्दारे जाहीर केले, की  ७० लाख पेंन्शनरांना ७५०० पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देणार. पण प्रत्यक्षात काहीच नाही अशाप्रकारे बातम्या पसरवून ९५ पेंन्शनरांंची फसवणूक चालवली आहे. आणि याचा निषेध म्हणून आज सर्व पेन्शनर कोरोनाच्या पार्शभूमीवर सोशल डिस्टन्स राखण्यात आपापल्या घरी बसुन एकदिवसाचे आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. 

केंद्रसरकारला पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्याची, पेन्शन वाढविण्याची सुबुध्दी दे, असे साकडे पेन्शनर्स नी विठ्ठला घातले. तसेच उद्या २ जुलै रोजी पी.एफ.कमीशनर,  तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे देसले म्हणाले.

आंदोलनात सुधाकर गुजराती, डी.बी.जोशी,  चेतन पणेर, सुभाष काकड, एम.एन.लासुरकर, सुभाष शेळके, शिवाजी ढोबळे, प्रकाश नाईक, शिवाजी शिंदे, निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब शिंदे, नरेंद्र कांबळे आदीसह मोठ्या संख्येने पेन्शनर्स सहभागी झाल्याचे म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय