Monday, May 13, 2024
Homeग्रामीणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी चोंडी येथे शासनाच्यावतीने अभिवादन करावे: विक्रम ढोणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी चोंडी येथे शासनाच्यावतीने अभिवादन करावे: विक्रम ढोणे

सांगली ( २४ मे) :-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे शासनाच्यावतीने अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.

यंदा लॉकडाऊनमुळे चोंडीत जयंतीसाठी लोकांना एकत्रित येता येणार नाही. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ किंवा अन्य शासकीय प्रतिनिधीने तिथे जावून अभिवादन करावे. अखिल भारतातील आदर्श महिला राज्यकर्त्या, लोककल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चोंडीचा असल्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. ३१ मे रोजी त्यांच्या जयंतीसाठी हजारो लोक चोंडीत येत असतात. पण तिथे राज्य शासनाच्यावतीने अभिवादनाचा कार्यक्रम होत नाही, हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या जन्मस्थऴी शासनाच्यावतीने साजरी केली जाते आणि तिथे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपस्थित राहतात, त्याप्रमाणे चोंडीतही शासनाच्यावतीने अहिल्यादेवी जयंती होवून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहेत. गतवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना धनगर विवेक जागृती अभियानाच्यावताने निवेदन दिले असल्याचे ढोणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय