Friday, May 17, 2024
Homeआरोग्यकोरोनाफिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा, वडवणी बाजारपेठेत तोबा गर्दी

फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा, वडवणी बाजारपेठेत तोबा गर्दी

कृषी सेवा केंद्र,दवाखाने,बँका,किराणा दुकान,कापड दुकान,भांडी भंडार,इलेक्ट्रॉनिक्स,ज्वेलर्स,गॅरेज इत्यादी दुकानात नियम धाब्यावर

वडवणी :- (प्रतिनिधी)

      कोरोना या महाभयंकर आजाराची भीती विसरुन वडवणी शहरात गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत सर्वच ठिकाणी व्यवहार सुरू झाले आहेत.शहरातील कृषी सेवा केंद्र,दवाखाने,बँका,किराणा दुकान,कापड दुकान,यांच्यासह इतर दुकानावर नागरिकांनी व महिलांनी गर्दी केलेली दिसत आहे.सोशल डिस्टंसिंग,चेहऱ्याला मास्क लावणे,आणि सॅनिटाइझर तर कुठे नावालाही दिसत नाही अशा पद्धतीत व्यवहार सुरु आहेत.

       बीड जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.एकत्र येणे टाळणे,स्वच्छता राखणे,तोंडाला मास्क वापरणे व सतत चेह-याला हात न लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे किंवा सतत हात साबणाने स्वच्छ ठेवणे असे सर्व नियम कडक केलेले असतानाही  वडवणी व तालुक्यातील जनतेला या नियमांचा विसर पडलेला दिसत आहे सध्या तालुक्यात पाऊस बऱ्यापैकी पडला असल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दुकानावर गर्दी केलेले दिसत आहे.कोणाच्याही चेहर्‍याला मास्क लावलेला दिसत नाही किंवा डिस्टंन्सही पाळताना दिसत नाहीत. कापड दुकान किराणा दुकान सोन्याची दुकान इलेक्ट्रॉनिक दुकान भांड्यांचे दुकान याठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे रस्त्याने चालतांनाही डिस्टंन्स पाळताना दिसत नाही वडवणी शहरातील स्टेट बँक अॉफ इंडियाच्या शाखेत आज पिक विमा,पिक कर्ज घेण्यासाठी आलेल्या शेतक-यांनी व इतर कामासाठी आलेल्यांनी तर सोशल डिस्टंसिंग धाब्यावरच बसविले होते.तुरळक नागरिकांच्या तोंडाला मास्क होता तर काहींना सॅनिटाइझर बद्दल विचारले तर ‘ते’ काय असते आम्हाला माहीत नाही असे सांगीतले.जणुकाही कोरोना हा आजार आम्हाला होणारच नाही.अशा अविर्भावात अनेकजण मिरवत होते.बँकांनी किंवा इतर अस्थापनांच्या मालकांनी ग्राहकांना नियम समजावुन सांगणे तसेच दुकानाच्या बाहेर पांढ-या रंगाने वर्तुळ काढणे आणि मास्क विषयी सागणे बंधनकारक असतांना दुकान मालक किंवा बँकेचे कर्मचारी काहीच सांगतांना दिसत नाहीत.यामुळे वडवणी शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनीही कोरोनाला हरविण्यासाठी व त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सतर्कता बाळगावी तरच कोरोनाला हरविण्यात आपल्याला यश येईल.

पोलीस यंत्रणाही झाली हतबल

        गेल्या चार महिन्यापासुन कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना योद्ध्याची भुमिका पार पाडणारी वडवणी पोलीस यंत्रणा वडवणीकरांच्या अशा वागण्यापुढे हतबल झाली आहे.हळुहळु शासनाने लॉकडाऊन अनलॉक करण्याचे ठरविले आसल्यामुळे नागरिक रस्त्यावरुन चालतांना किंवा बँकेत किंवा इतर अस्थापनाच्या ठिकानी नियम मोडण्याचे काम करतात.प्रत्येक वेळेसच नियम सांगतांना पोलीस यंत्रणेची दमछाक होता आहे. अशा नियमांची पायमल्ली करणा-या वडवणीकरांवर कडक नियम लादल्याशिवाय चालणार नाही.पोलीस यंत्रणेला अधिकचे अधिकार दिल्याशिवाय चालणार नाही.तरच आपण कोरोनाला हरवु.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय