Friday, May 17, 2024
Homeआरोग्यजय भवानी नगर वासियांनी केले कोविड योध्या मोनिका ताईंचे जंगी स्वागत

जय भवानी नगर वासियांनी केले कोविड योध्या मोनिका ताईंचे जंगी स्वागत

वडवणी :- (प्रतिनिधी)

            गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडले असून प्रशासन, पोलीस बांधव व आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक व सफाई कामगार गेल्या अनेक दिवसापासून कर्तव्यावर हजर होत आपली जबाबदारी पूर्ण पाडत कोरोनाशी मुकाबला करत आहेत, या कोरोना युद्धात अश्या कोविड योध्याची भूमिका महत्त्वाची असुन उल्लेखनीय आहे. खरतर त्याच्यामुळेच आपण आज थोड्या अधिक प्रमाणात मोकळा श्वास घेत आहोत हे आपण कदापी विसरून चालणार नाही.

                 

    जय भवानी नगर येथील मोनिका संतोष कुरकुटे ह्या आरोग्य विभागात नर्स या पदावर  कार्यरत असून बीड येथील जिल्हा आरोग्य रुग्णालयात त्या कोरोना काळात आरोग्य सेवेवर आहेत, तर गेल्या काही दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णासाठी असलेल्या विशेष वार्डात त्यांची ड्युटी होती, पंधरा दिवसांची सेवा संपल्यानंतर त्या घरी आल्या असता त्या वास्तव्यास असलेल्या जय भवानी नगर वासियांनी व त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचे फटाके वाजवून, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून व सांस्कृतिक रीती रिवाजाप्रमाणे व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत व त्यांचा सन्मान केला.

               

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय