Friday, May 17, 2024
Homeआरोग्यकोरोना टेस्टसाठी नवे दर जाहीर; राज्य शासनाचा निर्णय.

कोरोना टेस्टसाठी नवे दर जाहीर; राज्य शासनाचा निर्णय.

महाराष्ट्र जनभूमी :- खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

          राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी २५०० रुपये आकारायचे असा निर्णय झाला. मात्र काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जातात. वास्तविक रुग्ण स्वत:हून आल्यावर प्रयोगशाळेला पीपीई कीटचा तसेच वाहतुकीचा खर्च येत नाही अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २२०० आणि २८०० यामधला टप्पा म्हणून २५०० रुपये राज्य शासनाने ठरवून दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय