Monday, May 20, 2024
Homeग्रामीणचक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज; या उपाययोजना करण्यात येणार

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज; या उपाययोजना करण्यात येणार

प्रतिनिधी:- कोरोनानंतर राज्याला चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या यंत्रणा सज्ज होऊन हालचालींना वेग आला. पुढील दोन दिवसात या चक्रीवादळाचा प्रभाव रायगडपासून मुंबई, ठाणे पालघर गुजरात पर्यंत राहणार आहे. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटरवर पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्नरच्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत, 

           निसर्ग चक्रीवादळामूळे उदभवऱ्या आपत्ती व्यवस्थापनबाबत जुन्नरच्या आरोग्य विभागाने एका पत्राद्वारे उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

दिनांक ०३/०६/२०२० ने ०६/०६/२०२० या कालावधीत चक्रीवादळमूळे मोठया प्रमाणात जिवित व वित्त हानीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांन खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्याच्या दृष्टीने काही सूचना जारी केल्या आहेत.

          त्यामध्ये म्हटले आहे की, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयास वास्तव्य करुन रहावे, कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये आशा , अंगणवाडी सेविका यांचेकडे प्रथोमचाराचे साहित्य तसंच औ.आर.एस. उपलब्ध ठेवावेत, प्रत्येक गावातील पाणी शुध्दीकरण नियमितपणे होत असलेबाबत खातरजमा करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओ.एस.व्ही. चा साठा पुरेसा असलेबाबतची खातरजमा करण्यात यावी. सर्वांचे भ्रमणध्वनी कायम सुरु राहतील याची खबरदारी घेण्यात यावी. खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत काही कुटूंबे स्थलांतरित केली जाणार आहेत. 

                स्थलांतर करताना मुंबई , पुणे तसेच इतर कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्ती व स्थानिक व्यक्ती यांची वेगवेगळी व्यवस्था होणेसाठी इतर विभागांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतर केलेल्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच कार्यक्षेत्रामध्ये कोणताही आपत्तीचा प्रसंग घडल्यास त्याबाबत तालुका आरोग्य विभागास तसेच तहसिल कार्यालय जुन्नर या ठिकाणी तात्काळ कळविण्यात यावे आणि आपत्ती प्रसंगी Epidemic Kit / आवश्यक साहित्य व सामग्री तसेच सर्व संबंधित स्टाफसह वैद्यकीय अधिकारी कमीत कमी वेळेत फिल्डवर पोहचतील याचे नियोजन करण्याच्या सुचना जारी करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय