Friday, May 10, 2024
Homeग्रामीणनाथापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर-खुरुद परिवाराचा आदर्श विवाह संपन्न

नाथापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणकर-खुरुद परिवाराचा आदर्श विवाह संपन्न

वडवणी (प्रतिनिधी) :- वडवणी येथिल संजय कल्याणकर यांची कनिष्ठ कन्या चि.सौ.कां.सुरभी व नाथापूर येथिल श्यामसुंदर खुरुद यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि.योगेश यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श विवाह सोहळा रविवार दि.२४ रोजी नाथापूर याठिकाणी शेतामध्ये संपन्न झाला. शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करीत, सोशल डिस्टन्स राखत व केवळ दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह संपन्न झाला आहे.

                       याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासन व प्रशासनाने सर्व मोठ्या विवाह सोहळ्यावर निर्बंध लादले आहेत. या अनुषंगाने शासनाने ज्यांचे विवाह सोहळे ठरलेले आहेत अशांनी केवळ १० निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत घरगुती पद्धतीने आदर्श असा विवाह समारंभ करण्याचे आदेशित केले आहे. शासनाच्या याच सर्व नियम व अटींचे पालन करीत तसेच सोशल डिस्टन्स राखत व केवळ कुटुंबातील १० नातेवाईकांच्या उपस्थितीत बीड तालुक्यातील नाथापूर येथे कल्याणकर व खुरुद या परिवाराने आदर्श असा विवाह सोहळा आयोजित केला होता.

वडवणी येथिल रहिवाशी असणारे व सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर संजय कल्याणकर यांची कनिष्ठ कन्या चि.सौ.कां.सुरभी व नाथापूर ता.बीड येथिल प्रसिद्ध कापड उद्योजक श्यामसुंदर खुरुद यांचे ज्येष्ठ चिरंजीव चि.योगेश यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श असा विवाह सोहळा रविवार दि.२४ मे २०२० रोजी नाथापूर याठिकाणी शेतामध्ये संपन्न झाला. कोणताही थाटमाट न करता व फाजील खर्चाला फाटा देत आजच्या परिस्थितीचे भान राखत दोन्ही परिवारांनी सामंजस्याने पार पाडलेला हा विवाह सोहळा खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श असा ठरला आहे. उर्वरित सर्व नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलच्या आधुनिक सुविधेद्वारे आहे त्या ठिकाणावरुनच या विवाह सोहळ्यास आपली उपस्थिती लावून या नवदांम्पत्यास शुभाशिर्वाद दिले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय