Monday, May 13, 2024
Homeग्रामीणविद्युत मंडळाचे वडवणीत धडक मोहीम २४० विजचोरांचे साहित्य जप्त

विद्युत मंडळाचे वडवणीत धडक मोहीम २४० विजचोरांचे साहित्य जप्त

(वडवणी/प्रतिनिधी) तेलगाव विद्युत महावितरणाकडुन वीज चोरी रोखण्यासाठी मंगळवार दि.१४ रोजी वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरांमध्ये विज चोरा विरोधात धडक मोहीम राबवून विद्युत पोलवरून आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांचे केबल शेगडी हिटर आदी साहित्य जप्त करण्यात आले.

     

       विद्युत महावितरणाचे डी वाय पेन्सिलवार,इंजिनियर जे इ थावरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  वीज चोरी रोखण्यासाठी विज चोरा विरोधात वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये शहरातील २४० विज चोरांचे साहित्य जप्त करण्यात आले यामध्ये विद्युत पोल वरून लाईट घेण्याचे केबल घरातील शेगड्या हिटर आदी साहित्य जप्त करण्यात आले पुढील काळात वीज चोरी केली तर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले या धडक मोहिमे मध्ये मस्के साहेब, धुमाळ साहेब, मुंडे साहेब, कुरेशी साहेब, जाधव चव्हाण, साहेब जाणकर, निपटे साहेब, साहेब वायचळ, साहेब किशोर जाधव साहेब अधिक कर्मचारी बांधव सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय