Sushma Andhare : आगामी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकिय नेत्यांचे राज्यभरातील दौरे वाढले आहे. विरोधक देखील सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये कामाची पाहणी करत नागरिकांच्या समस्येवर टीका करताना दिसत आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील गौतमी पाटीलचे नाव घेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका केली.
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा शहापूरमध्ये मुक्त संवाद दौरा सुरु आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मतदारसंघातील काम आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सडकून टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, कपिल पाटील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. भिवंडीमध्ये एकूण मोठी 14 आणि छोटी 4 धरणे आहेत. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत. जर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर भाजपमधून गौतमी पाटीलला निवडणुकीसाठी तिकिट द्या, अशी टीका केली आहे. कपिल पाटील यांना गर्दी जमवता येत नाही, कोणी त्यांच्याकडे जात नाही, म्हणून हे आता त्यांच्याही लक्षात आलं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
ब्रेकिंग : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे
मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा
मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार
यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी
भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा