Saturday, April 27, 2024
Homeराजकारणगुन्हेगारांना भाजपाप्रणित मोदी सरकार पाठीशी घालत आहे – खासदार ए.ए.रहीम

गुन्हेगारांना भाजपाप्रणित मोदी सरकार पाठीशी घालत आहे – खासदार ए.ए.रहीम

मुंबई : आज देशात दोन महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न उभे ठाकले आहेत. कुस्तीपटू महिला खेळाडु, बालिकेंवर लैंगिक शोषण आणि लोकशाही अधिष्ठित देशात धर्मांधता आणि ब्राह्मण्यशाही रुजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न. यामुळे देशात अराजकता माजत आहे. अशावेळी जागतिक पातळीवर देशाचे नावोलौकीक करणाऱ्या महिला खेळाडूंवर अत्याचार करण्याऱ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर अद्यापही कायदेशीर कारवाई होत नाही. त्यांना अटक केली जात नाही, उलट अशा गुन्हेगारांना भाजप सरकार पाठीशी घालत आहे. या मोदी सरकारचा जाहिर निषेध करतो, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ए.ए.रहीम यांनी केले.

मुंबई येथे आयोजित DYFI महाराष्ट्र राज्य कमिटी बैठकीत आले असताना आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

ते पुढे म्हणाले की, नव्या संसद भवन चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. संसद हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी खासदारांना प्रवेशाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र यामध्ये धर्मगुरू, संन्यासी, संत साधू आदींच्या समूहाने धार्मिक विधी करत हिंदुत्वाचा अजेंडा रुजवत असून लोकशाही, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक ही मूल्ये मातीमोल करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. ही अत्यंत निंदनीय बाब असून लवकरच या विरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.

येणाऱ्या काळात संविधान, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वाचवण्यासाठी युवकांना संघटित होऊन लढण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी DYFI चे राज्य अध्यक्ष नंदू हडळ, राज्य सचिव दत्ता चव्हाण, केंद्रिय कमिटी सदस्य लक्ष्मी शमंतुल, अनिल वासम, खजिनदार महेंद्र उघडे, संजिव शमंतूल, विक्रम कलबुर्ग्गी, मोहन जाधव, संजय कांबळे नासिर शेख, सुदाम टाकरे, कैलास बलसाने, राजेश दळवी या सह राज्य कमिटी सदस्य उपस्थित होते.

 हे ही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय