मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथे भारतीय जनता पक्षाच्या कोकण विकास आघाडीच्या वतीने आखाडी पार्टीसाठी कोंबडी वाटपाचा कार्यक्रम आज शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. दिप अमावस्या गटारी निमित्त कोंबडी वाटप असा मजकूर असलेली पोस्टर्स समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यापासून या कोंबडी वाटपाची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मुंबईतील नागरिक येथे मोठया प्रमाणात गर्दी करणार आहेत,असे समजते.
मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाने टीआरएस नेत्याने वारंगलमधील काही स्थानिक लोकांना एक दारुची बाटली अन् जिवंत कोंबडीचे वाटप केले. टीआरएस पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचा मुलगा केटी रामाराव यांच्या मोठमोठ्या कट-आउटखाली हे वाटप केलं. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण
नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन
जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

