Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चांद्रयान ३ : मोहिमेत केरळच्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे योगदान

कोझिकोडे / जलील बाबू : भारताची महत्वाकांक्षी मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चे यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे २.३५ मिनिटांनी लॉन्च झालं. हे यान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर लँड होईल. या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे.

---Advertisement---

या चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणात केरळमधील तीन पब्लिक सेक्टर कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. केल्ट्रॉन, केएमएल (Keyhole Markup Language) आणि एसआयएफएल (Steel and Industrial Forgings Ltd) ने उत्पादित केलेली विविध उत्पादने चांद्रयान-३ मोहिमेत वापरण्यात आली आहेत.

४१ इलेक्ट्रॉनिक्स मॉड्यूल पॅकेजेससह केल्ट्रॉन पासून तयार केले गेले होते तर KML मधील टीटॅनियम स्पंज मिश्र धातुंचा वापर अंतराळ यानाचे महत्त्वपूर्ण घटक बनविण्यासाठी केला गेला होता. ‘फोर्जिंग्ज आणि इंडस्ट्रियल स्टील आणि फोर्जिंग्स लिमिटेड’ या आणखी एक पब्लिक सेक्टर कंपनी कडून टीटॅनियम आणि अल्यूमिनियमचे इतर उपकरणे देखील तयार केली गेली.

---Advertisement---

जसा भारत जगासमोर अभिमानाने उभा आहे, केरळलाही या मिशनचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. यशस्वी प्रक्षेपण शक्य करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे केरळ मधील जनता व केरळ सरकारने अभिनंदन केले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles