पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – आमदार महेश लांडगे यांचा जनसंपर्क वाखाणण्यासारखा आहे. या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर ते भोसरी मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. (Bhosari Vidhan Sabha 2024)
यावेळी बहल म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात विकासाची गंगा आणली. महायुतीच्या माध्यमातून त्यांना मानणारा वर्ग महेश लांडगे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वतः आमदार लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे ते विजयाची हॅट्रिक करतील.
अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र आ. लांडगे यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा करून तो मार्गी लावला. तळवडे भागातील जमिनी विकसित केल्या त्या भागात रस्ते केले. (Bhosari Vidhan Sabha 2024)
प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न सुटला नव्हता आमदार महेश लांडगे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा मार्ग मोकळा झाला. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार लांडगे यांनी आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उचलून पाणीपुरवठा सुरळीत करणारी योजना मार्गी लावली. मोशी भागात यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा ध्यास घेऊन हा प्रकल्प साकारला. आमदार लांडगे हे स्वतः खेळाडू असल्याने कुस्तीसाठी अद्ययावत स्टेडियम केले.
विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तसेच महिलांसाठी महायुती सरकारने राबविलेली लाडकी बहिण योजना याचे फायदे संबंधितांना मिळवून देण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रयत्न केले असे बहल यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार लांडगे यांनी प्रचंड जनसंपर्क ठेवला आहे. पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज पुरवठा, मनपा व राज्य सरकारच्या विविध योजनांची मदत अशा सर्व प्रश्नांवर लोकांच्या तक्रारी मागवून त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्प लाईन द्वारे
त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला बचत गटांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी सुरू केलेली इंद्रायणी थडी हे सर्वात मोठे प्रदर्शन ठरते. आमदार लांडगे यांचे हे कार्य आहेच.
त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे. महायुतीचा धर्म पाळून आम्ही मोठ्या मताधिक्याने लांडगे यांना विजय मिळावा यासाठी परिश्रम घेत आहोत. लांडगे हे विजयाचे हॅट्रिक करतील असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर