गुजरात : भरूच (Bharuch) येथील अंकलेश्वरमधील एका खासगी कंपनीकडून वॉक इन इंटरव्ह्यू साठी भरूच शहारातील एका खाजगी हॉटेल मध्ये नोकरीसाठी आलेल्या तरुणांची तुफान गर्दी झाली. उमेदवार मुलाखतीसाठी प्रथम प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुणांच्या जमावाने धक्काबुक्की केली परिणामी हॉटेलच्या बाहेरील रेलिंग तुटल्याने अनेक तरुण खाली पडले.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर (Gujarat Model) टीका केली आहे. काँग्रेसने ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्या टीका केली आहे. (Bharuch)
माहितीनुसार, या मुलाखतीमध्ये प्लांट ऑपरेटरसाठी, सुपरवायझरसाठी, मेकॅनिकल फिल्टरच्या रिक्त पदांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली होती. आयटीआय पास, B.Sc.-MSc, डिप्लोमा इन केमिकल पदवी, ITI पास या उमेदवारांची मुलाखत कंपनीकडून आयोजित करण्यात आली होती. यावेळी हॉटेलची रेलिंग तुटून गुजरात मॉडेलचा पर्दाफाश झाला. नरेंद्र मोदी हे बेरोजगारीचे मॉडेल संपूर्ण देशावर लादत आहेत. अशी टीका काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
फक्त 10 जागांसाठी बेरोजगारी प्रचंड गर्दी केल्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत भरूच जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचा संबंध नेटकऱ्यानी बेरोजगारीशी जोडला आहे, माहितीनुसार, अंकलेश्वर येथील लॉर्ड्स प्लाझा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. तेथे थरमॅक्स कंपनीतर्फे वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.
(Bharuch)
हेही वाचा :
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण