Monday, May 13, 2024
Homeकृषीसोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी रायझिंग सन सीड्स १९४ कंपनी विरुध्दात गुन्हा दाखल....

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी रायझिंग सन सीड्स १९४ कंपनी विरुध्दात गुन्हा दाखल. वाचा सविस्तर



(वडवणी) : रायझिंग सन सीड्स १९४ या कंपनीचे सोयाबीन बी शेतात पेरले आसता ते उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची फसवणुक झाली असल्याने कंपनी विरुध्दात कृषी तालुका आधिकारी यांच्या फिर्यादीवरुन वडवणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रायझिंग सन सीड्स १९४ या कंपनीचे सोयाबीन बी शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात शेतात पेरले होते.परंतु हे बी पाऊस काळ चांगला आसताना हि उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची फसवणुक झाली असल्याने तालुक्यातील तब्बल ३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी आधिकारी जनार्धन भगत यांच्याकडे या कंपनी विरोधात लेखी तक्रारी केल्या होत्या आणि याचं तक्रारीच्या आधारे तालुका कृषी आधिकारी भगत यांच्या फिर्यादीवरुन रायझिंग सन सीड्स १९४ त्रिवाली आपर्टमेंट धनतोली नागपूर यांच्या विरुध्दात गुन्हा र.नं.१५८ / २०२० कलम ४२० भादवी सह कलम २३ ए (२) बियाणे नियम १९६८ सह कलम १९.२१ बियाणे कायदा १९६८ सह कलम ३७ अत्यवश्यक वस्तु कायदा १९५५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा आधिक तपास वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश टाक हे करत आहेत.

शंभर एकरवर बियाणाची पेरणी – भगत 

सदरील कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते. ते उगवलेच नसल्याने तब्बल ३३ शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. हे बियाणे जवळपास अंदाजे शंभर एकर वर बियाणाची लागवड केली होती आणि याच आधारावर सदरील कंपनी विरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती वडवणी तालुका कृषी आधिकारी जनार्धन भगत यांनी महाराष्ट्र जनभूमी न्यूजशी बोलताना दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय