Sunday, May 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना शिरकाव शून्य : वडवणीकरांनो काळजी घ्या, पुढे धोका आहे.

कोरोना शिरकाव शून्य : वडवणीकरांनो काळजी घ्या, पुढे धोका आहे.



(वडवणी):- अनलॉकच्या काळात बीड जिल्ह्यातील कोरोना या महामारी रोगाने उच्चांक अंकाकडे वाटचाल केली आहे. बीड शहरासह, परळी, गेवराई, आष्टी-पाटोदा, अंबेजोगाई आणि धारुर, माजलगांव शहरात शिरकाव केला असला तरी मात्र वडवणी शहरात किंवा तालुक्यात शिरकाव झाला नसल्याने वडवणीकरांची काळजी यात मुख्य भुमिका बजावणार आहे परंतु पुढे धोका आहे म्हण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. मात्र शिरकाव न होण्यासाठी आता जनतेनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता दोन हात करण्याची वेळ नक्कीच आली आहे.

    कोरोना या साथ रोगाचे जागतीक महामारीचे संकट रोखण्यासाठी देशाबरोबरच राज्यातही  लाॅकडाऊन करण्यात आले होते. परंतु जनजिवन विस्कळीत होऊ नये,गोरगरिब जनतेवर उपासमारिची वेळ येऊ नये. यासाठी ३१ मे नंतर हळु-हळु लाॅकडाऊनच्या वेळेत व नियमात शिथीलता देण्यात आली व आनलॉकला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,पोलीसप्रशासन यांच्या अथक नियोजनामुळे बीडचे  शुन्य कायम राहीले परंतु नंतर परजिल्ह्यातुन, मुंबई, पुणे, औंरगाबाद सह इत्यादी ठिकाणाहुन आलेल्या संक्रमितांमुळे बीड जिल्ह्यातही कोविड-१९ शिरकाव झाला व  आजमितीस तर जिल्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर वडवणी तालुक्यातही दुसऱ्या लाॅकडाऊनच्या दरम्यान ३ पाॅजीटिव्ह आढळुनही आले. परंतु आरोग्येविभागाच्या चोख नियोजनामुळे तात्काळ उपाययोजना करण्यात आल्याने व जिल्हाधिकारी यांनी काही दिवस त्या- त्या भागात  संचारबंदी लागु केल्याने पुन्हा वडवणी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही सुदैवाने आजपर्यंत वडवणी तालुका अगदी शुन्यावरच आहे परंतु धोक मात्र कायम आहेच.

   वडवणीच्या अगदी उशापायथ्यालाच परळी व बीडमध्ये संक्रमीतांची संख्या वाढत आसल्याने व वडवणी शहर बीड – परळी राज्यावर आसल्याने दोन्ही शहराची ये-जा चालु आहे. त्यामुळे वडवणीचा धोका कायम आसल्याचे स्पष्ट दिसुन येते आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आपल्या तालुक्यात काहीच नाही या अविर्भावात तालुक्यातील जनता,व्यापारी सर्वचजण बेफिकरपणे मास्क,सामाजिक अंतर यासह जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियम न पाळता राजरोसपणे फिरतांना  दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर वडवणी शहरातील विशेष करुन बीड-परळी या मार्गावरिल छोटेमोठे व्यावसायीक यांनी एकदम दक्ष राहणे गरजेचे आसुन तालुक्यातील जनतेने सुध्दा आता स्वंयं लाॅकडाउन पाळुन स्वतः ची काळजी  घेणे गरजेचेच आहे. याबरोबरच नगरपंचायत,आरोग्य विभाग,  पोलीसप्रशासन इत्यादि स्थानिक प्रशासनाने देखील जनतेकडून जिल्हाधिकार्यांच्या नियमांचे पालन करुन घेणे आवश्यक आहे. तरच वडवणी तालुका शेवट पर्यंत शुन्यावरच राहील आणी तो राहीलाच पाहीजे ही जबाबदारी आता फक्त शासन,प्रशासन यांचीच नसुन व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक तालुक्यातील जनता या सर्वांचीच आहे.

तर तालुका शुन्यच राहिल – डॉ.बोंगाने


   आपल्याकडे काहीच नाही म्हणत लोक विनाकारणही फिरताना दिसत आहेत गरज नसेल तर बाहेर पडूच नये तसेच बाहेर  जातांना तोंडाला मास्क व सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आसुन आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी घरातील एकाच तरुणाने बाहेर पडावे त्याचबरोबर स्थानिक प्रशानानेही  सतर्क रहावे आणी तालुक्यातील जनतेनेही नियमांचे पालन करुन स्वतः ची काळजी घेऊन त्यांना सहकार्य करणे गरजेचे जेणे करुन आजप्रमाणेच तालुका शुन्यावरच राहील अशी प्रतिक्रिया डाॅ.दिनकर बोंगाने यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय