Monday, May 13, 2024
Homeआरोग्यकोरोनाबीड येथून ये-जा करीत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना वडवणी शहरात बंदी करावी...

बीड येथून ये-जा करीत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना वडवणी शहरात बंदी करावी – मा.आ.आंधळे

(वडवणी) : सध्या बीड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वडवणी शहरात व तालुक्यात सध्या एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही परंतु बीड घेऊन ये जा करीत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे वडवणीत कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहुन कोरोना निर्मूलनासाठी काम करण्याचे प्रशासनाने आदेश द्यावे, अशी मागणी माजी आमदार केशवराव आंधळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

वडवणी तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,नगरपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, कृषी कार्यालय, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बालप्रकल्प कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, भारतीय स्टेट बँक, यासह इतर खाजगी बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट व खाजगी रुग्णालय यातील जवळजवळ सर्व अधिकारी कर्मचारी बीडहुन ये-जा करतात. यांची संख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. खरं म्हणजे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून कोरोना या महाभयंकर आजाराच्या निर्मूलनासाठी काम करायचे असते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सिव्हिल सर्जन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच इतर जिल्हा स्तरावरील अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेऊन कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु तालुकास्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांना कसलेच सोयरसूतक राहीले नाही.

 

वडवणी शहरातील सदरील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयाला राहत असल्याचे दाखवून हजारो रुपये घर भाडे घेतात. यातुन एक प्रकारे शासनाची आर्थिक फसवणूकच करीत आहेत. यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घर भाड्यापोटी घेतलेली रक्कम वसूल करण्यात यावी. यातील बरेच अधिकारी-कर्मचारी बीड शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये राहतात. बीड शहरात संचारबंदी लागू असतानाही सर्व लोक बीडहुन ये-जा करीत होते. यांच्यासाठी संचारबंदीचा नियम नाही काय? तरी शासनाने त्वरित लक्ष घालून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मुख्यालयाला राहण्याची सक्ती करावी. अशी मागणी माजी आमदार केशवराव आंधळे यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय