Beed : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया बीड जिल्हा (Beed) कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयात निवेदने देऊन प्रशासनाकडे विविध प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एसएफआय बीड (Beed) तालुका कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांना बस पास मोफत मिळावा, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅडची मशीन बसवण्यात यावी, शाळेत महाविद्यालयात पिण्याचे स्वच्छ फिल्टर पाणी मिळावे, शाळा महाविद्यालयात अत्याचार विरोधी समिती स्थापन करण्यात यावी, विद्यार्थ्यांचे नियमित क्लास व प्रॅक्टिकल घेण्यात यावे, या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा फीस माफ करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयात ग्रंथालयाची व व्यवस्था करण्यात यावी, जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालयात प्रोजेक्टर बसवण्यात यावेत, सर्व शाळा महाविद्यालयात स्वच्छ बाथरूम असावेत व ज्या ठिकाणी बाथरूम नाहीत त्या ठिकाणी बाथरूम बांधण्यात यावेत, सदरील मागण्या मान्य करण्यात नाही आल्या तर SFI बीड कमिटीच्या वतीने विद्यार्थी अर्धनग्न आंदोलन करतील असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव विष्णू गवळी, अक्षय वाघमारे, रमेश नाईकवाडे, आकाश कचरे, स्वप्नील तेलप, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले