Sunday, July 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBajaj auto : जगातील पहिली CNC बाईक आज (5 जुलै) लॉन्च होणार

Bajaj auto : जगातील पहिली CNC बाईक आज (5 जुलै) लॉन्च होणार

देशातील आणि जगातील सर्वात मोठी मोटरसायकल उत्पादक बजाज ऑटो कंपनी जगातील पहिली CNG बाईक 5 जुलै 2024 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच करणार आहे. Bajaj auto

सध्या कंपनीने आपल्या आगामी CNG बाइक देशात लाँच करण्यापूर्वी एक नवीन टीझर प्रदर्शित केला आहे. बजाजच्या या छोट्या टीझरमध्ये तुम्हाला बजाज सीएनजी बाइकची झलक पाहायला मिळेल. Bajaj auto

बाईकच्या डिझाईनमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे CNG आणि पेट्रोल साठी पर्याय म्हणून एक स्विच दिला आहे.डाव्या बाजूच्या हँडलवर हा स्विच (dual-fuel system swich) दिला आहे.

बजाजची नवीन सीएनजी बाईक इतर 125 सीसी मोटारसायकलींशी स्पर्धा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यात ADV-बेस्ड डिझाइन आहे, जी ग्राहकांना आकर्षित करेल. तिच्यात सुमारे 5 लिटर पेट्रोल ठेवण्याची क्षमता असलेली एक लहान इंधन टाकी देण्यात आली आहे आणि बाईकच्या व्हीलबेसमध्ये एक लांब सीट आहे, तिच्या खाली CNG टाकी आहे.

दोन्ही इंधनांची एकत्रित क्षमता पारंपारिक 125 सीसी कम्युटर बाईकसारखीच रेंज देईल. (Bajaj Auto’s first CNG bike marks a significant milestone for the Indian automaker and the two-wheeler industry at large)

ही बाईक किमतीनुसार जास्त मायलेज देणार आहे. देशातील सर्व ग्राहकांना या सीएनजी / पेट्रोल हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून बजाज कंपनीच्या संशोधन विकास विभागाने ही बाईक निर्माण करताना भारतीय आणि जागतिक बाजारपेठेचा विचार करून बाईक निर्मिती करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

यामुळे ग्राहकांना परवडणारी व पर्यावरण पूरक मोटारसायकल उपलब्ध होणार आहे. या बाईकची किंमत 90 हजार ते 1,25000 रुपये या किमतीत ग्राहकांना मिळणार आहे, याबाबत अधिकृत माहिती लॉन्चिंग कार्यक्रमानंतर उपलब्ध होऊ शकेल, असे ऑटो मेकर्स सूत्रांकडून समजते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय