Friday, May 10, 2024
Homeराज्यआयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

योजना : केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यातील एक आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना होय. यामार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते. Ayushman Bharat Yojana or Pradhan Mantri Jan Arogya Yojana

ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 साली सुरु करण्यात आली होती. या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेतून 10 कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.

कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

अर्ज कोण करू शकतो ?

आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana News) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव SECC–2011 मध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, SECC म्हणजे काय? SECC म्हणजे, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

असा करा ऑनलाईन अर्ज !

1. सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.

2. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.

3. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.

4. आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.

5. तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.

6. मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.

7. जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.

8. तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.

याशिवाय, तुम्ही जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता. तसेच शहरी भागातील निवडक हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ मिळू शकतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय