Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवारांगनाच्या मुलांसाठी आशेचा एक किरण – मंथन फाउंडेशन

वारांगनाच्या मुलांसाठी आशेचा एक किरण – मंथन फाउंडेशन

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : मंथन फाउंडेशन मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, पोष्टिक आहार , सामाजिक सुरक्षा व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास या पंचसूत्री वर आधारित कार्यक्रम राबवित असते. बरेचदा वारांगनाच्या मुलांना अत्याचार व भेदभावाचा सामना करावा लागतो, त्यांना शाळेतील समवयस्क मुलांकडून सहजासहजी स्वीकारले जात नाही. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी संस्था प्रयत्न करत असते. विशेषत: गरीब, निराधार, बेघर, दुर्धर आजार पालकांची मुले व असुरक्षित मुले यांच्या काळजी व संरक्षणासाठी मंथन फाउंडेशन काम करते. A ray of hope for the children of Warangana – Manthan Foundation

बुधवार पेठेतील मुलांसाठी या विशेष कार्यक्रमात मुलांसाठी चित्र काढणे, रंगविणे , गाणी, नृत्य व सर्वांना आवडणारा खाऊ असे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील तीन उत्कृष्ट चित्र काढलेल्या मुलांना कौतुक म्हणून बक्षीस देण्यात आले. सर्व मुले उत्साहात आनंदाने सहभागी झाली होती. निरागस चेहरा व हसरे चेहरे खूप आनंद व समाधान देऊन जातात. 

आशा भट्ट, अध्यक्षा मंथन फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता सुरवसे प्रकल्प व्यवस्थापक, श्रुतिका यादव, सारिका पवार, सुवर्णा पवार, सोनाली हांडे, बाबू शिंदे व सर्व पिअर एज्युकेटर यांनी मेहेनत घेतली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय