Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यAsha group promoters : आशा व गटप्रवर्तक या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा

Asha group promoters : आशा व गटप्रवर्तक या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा

जामनेर : ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका (Asha group promoters) ह्या कणा आहेत. त्यांच्यामुळेच आरोग्य यंत्रणेला कामकाज करणे सुलभ झाले आहे. आशा स्वयंसेविका यांनी भ्रूणहत्येबाबत जागृत राहून ‘मुलगी वाचवा देश वाचवा’ मोहिमेत सक्रियपणे काम करावे. त्यात कोणतीही अडचण आल्यास आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग तालुका जामनेर, जामनेर वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने ग्रामीण भागात तळागाळात कामकाज करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा (Asha group promoters) गौरव करण्याच्या उद्देशाने आशा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, पत्रकार मोहन सारस्वत, आयएमएचे डॉ. संदीप पाटील, डॉ.प्रशांत महाजन, निमा संघटनेचे डॉ. नंदलाल पाटील, डॉ.रवींद्र कासट, होमीओपॅथी असोसिएशनचे डॉ.मनोज विसपुते, डॉ.योगेश सरसाळे, जामनेर डॉक्टर असोसिएशनचे डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ.अजय पाटील, डॉ. राहुल माळी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात काम करणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा विरंगुळा व्हावा, या उद्देशाने त्यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, विविध स्पर्धांचे आयोजन जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांच्याकडून करण्यात आले. दैनंदिन कामकाजाचा ताण टाळण्याच्या उद्दिष्टाने व गटप्रवर्तक आशा यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने आशा व गटप्रवर्तक यांच्यासाठी वारंवार अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, आज झालेल्या कार्यक्रमाबद्दल सर्व आशा स्वयंसेविका यांनी समाधान व्यक्त केले.

यशस्वीतेसाठी गटप्रवर्तक सविता कुमावत, सुनयना चव्हाण, माया बोरसे, रेखा तायडे, सुनीता पाटील, अर्चना टोके, माधुरी पाटील, यमुना पाटील, डॉ.नरेश पाटील, डॉ.संदीप कुमावत, डॉ. दानिश खान, डॉ.मनोज पाटील, डॉ.किरण पाटील, डॉ. कल्याणी राजपूत यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले.

whatsapp link

हे ही वाचा :

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

संबंधित लेख

लोकप्रिय