Monday, March 17, 2025

Akole: …अन्यथा महावितरण ऑफिसला टाळे ठोकू – कॉम्रेड एकनाथ मेंगाळ

Akole : …अन्यथा महावितरण ऑफिसला टाळे ठोकू, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अकोले तालुका सचिव कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी दिला आहे. Akole News

कॉम्रेड मेंगाळ म्हणाले, धुमाळवाडी येथे शॉक लागून जखमी झालेल्या तरुणांना महावितरणकडून अत्यंत तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मेन लाईन तारांना झोळ पडलेला असताना महावितरणाचा काहीच दोष नाही या आविर्भावात महाविरण अधिकारी वावरत आहेत.

शॉक लागलेले तरुण गंभीररीत्या जखमी होऊनही महावितरण कंपनीने फक्त तीन हजार रुपये देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे असे जखमी युवकांच्या नातेवाईकांनी कळविले आहे. या मदतीमध्ये दवाखान्याचे एका दिवसाचे बिल सुद्दा सुटत नाही. महावितरण कंपनीने गोरगरीबांची थट्टामस्करी करू नये. पिडीतांना भरीव अशी मदत करावी. उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा. अन्यथा महावितरणच्या अकोले येथील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची महावितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

तालुकाभर शेतांमध्ये वीज वाहक तारांना झोळ पडले आहेत. पोल वाकलेले आहेत. किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याबाबत वारंवार आवाज उठवून सुद्धा हे झोळ व वाकलेले पोल दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. आजवर आदिवासी समाजातील अनेकांचा यामुळे जीव गेला आहे. मात्र आदिवासी गरिबांना कोणीच वाली नसल्याने त्यांना ना पुरेशी भरपाई मिळाली ना पोल व तारा दुरुस्त झाल्या. दुर्घटना घडली की नेते येतात. भाषणे होतात. फोटो काढले जातात. दुःख व नुकसान मात्र फक्त बाधित व्यक्ती व कुटुंबाला सहन करावे लागते. गरीब जनता यापुढे असे अन्याय सहन करणार नाही. प्रसंगी वीज कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

Related Articles

- Advertisement -

Latest Articles