Tuesday, May 14, 2024
Homeराजकारणस्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो… अजित पवार म्हणाले

स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो… अजित पवार म्हणाले

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील तसेच देशातील विविध विषयांवर संवाद साधला. देशात दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काळा पैसा बाहेर काढण्याची भूमिका असताना देशातून हवालामार्फत साडेचारशे कोटी रुपये बाहेर जाण्याच्या बातम्या समोर येत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. जर नोटाबंदी करायची होती तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे त्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायची गरज नव्हती, असेही अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडी संदर्भात कोणाताही निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. ते निर्णय तीनही पक्षाला मान्य असतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरुन कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीची एकजूट राहावी अशी आमची भूमिका आहे. स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो की महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समीर वानखेडे यांच्या प्रकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही स्पष्टपणे याविषयी भूमिका मांडली. मात्र त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता जनतेसमोर सीबीआयच्या माध्यमातून सत्य बाजू येत आहे, असे अजित यांनी सांगितले.

केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. अशा चौकशींवर अनेक सत्ताधारी पक्षामध्ये गेलेल्या आमदारांनी आणि खासदरांनी जे वक्तव्य केले आहेत ते जनतेने पाहीले. वास्तविक सत्ताधाऱ्यांकडून द्वेष भावानेने, राजकीय सूडबुद्धीने या चौकशीसाठी कोणाला बोलवता येऊ नये असे मत अजितदादांनी व्यक्त केले. अशा यंत्रणांच्या चौकशीसाठी कोणी गेल्यास त्यावर कोणतेही वक्तव्य माझ्याकडून करण्यात आलेले नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र या गोष्टीतून काही लोक जाणीवपूर्वक वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र असा चौकशींवर मी कोणतेही वक्तव्य करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी माध्यमांसमोर मांडली.

हे ही वाचा :

WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यात नोकरी शोधताय ? विविध शासकीय, निमशासकीय विभागात मोठी भरती

व्हिडिओ : पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

जसा गाडीचा, पिकाचा विमा घेतो; तसा स्वतः चा विमा हवाच ! आजच विमा काढून घ्या !

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय