Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत, आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा यशस्वी 

तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत, आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा यशस्वी 

गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : तळवडे आणि परिसरातील महावितरण प्रशासनाच्या उघड्यावरील वीजवाहिन्यांमुळे धोका निर्माण झाला होता. शॉर्ट सर्किटच्या घटना आणि औद्योगिक वीजपुरवठा विस्कळीत होत होता. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू करण्यात आले. 

भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने तळवडेतील गणेशनगर- ज्योतिबानगर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून सुरू करण्यात आले. 

यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, स्वीकृत माजी नगरसेवक पांडुरंग भालेकर, रुपीनगर शिक्षण संस्थेचे सचिव एस. डी. भालेकर, संचालक बंडुशेठ भालेकर, भाजपाच्या कोशागार अस्मिता भालेकर, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक धनंजय वर्णेकर, महावितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल हुलसुंदर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

तळवडे-रुपीनगर भागात गणेशनगर आणि ज्योतिबानगर येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत. नागरी वस्तीमध्ये वीजवाहिन्या उघड्यावर असल्यामुळे धोका निर्माण झाला होता. वीजवाहिन्या भूमिगत केल्यामुळे सुमारे २० हजार लोकसंख्या आणि औद्यागिक क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. तसेच वीज चोरीसारख्या घटनांना आळा बसणार आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड

माजी नगरसेवक शांताराम भालेकर म्हणाले की, तळवडे येथे गणेशनगर- ज्योतिबानगर भागातील महावितरण वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून या कामाचा पाठपुरावा करुन आता वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू झाले. आगामी १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल.

हे ही वाचा :

WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

पुण्यात नोकरी शोधताय ? विविध शासकीय, निमशासकीय विभागात मोठी भरती

व्हिडिओ : पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय