Wednesday, April 24, 2024
Homeराष्ट्रीयWhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?

WhatsApp : WhatsApp हे सर्वात लोकप्रिय मेसेंजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲप सातत्याने वेगवेगळे दमदार फिचर्स आणत असते. व्हॉट्सॲप या इन्स्टंट चॅटिंग ॲपवर ज्या फीचरची युझर्स आतुरतेने वाट पाहत होते, असे नवीन भन्नाट फिचर्स WhatsApp ने आता पुन्हा आणले आहे. या नव्या फीचरमुळे एकदा सेंट झालेला मेसेजही पुन्हा एडिट करता येणार आहे.

आपण सर्वचजण व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. बऱ्याचदा मॅसेज करताना चूकीचा मॅसेज सेंन्ड होतो. पण तो मेसेज बदलता येणार नसल्याने आपल्याला तो एकतर डिलीट फॉर एवरीवन करावं लागतं. समोरच्याला हे दिसतं देखील की आपण मेसेज डिलीट केला आहे. पण आता हा त्रास संपणार असून चुकून सेंट झालेला चुकीचा मेसेजही एडिट करता येणार आहे. व्हॉट्सॲपचे कंपनीचे CEO मार्क झुकरबर्गयांनी स्वतः या फीचरबाबत माहिती दिली आहे.

सध्या हे फीचर काही लोकांच्याच अॅपवर दिसत आहे. मात्र लवकरच हे फीचर सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या हे फीचर आयओएस मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध झालं आहे. जर तुम्हाला अपडेट मिळत नसेल तर तुम्ही प्लेस्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करु शकता. आणि या नव्या फिचर्सचा आनंद घेऊ शकता.

असा मॅसेज करा एडिट

या नव्या फीचरनुसार तुम्हाला फक्त 15 मिनिटांपूर्वी पाठवलेला मेसेज एडिट करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तो मॅसेज एडिट करता येणार नाही. जो मॅसेज एडिट करायचा आहे तो तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला एडिट मेसेजचा पर्याय दिसेल. एडिट मेसेजवर टॅप केल्यानंतर तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करु शकता. त्यानंतर पुन्हा सेंडवर टॅप करताच ओरिजनल मेसेजच्या जागी एडिटेड मेसेज सेंड होईल.

हे ही वाचा : 

टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

 वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

 भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय