Friday, May 17, 2024
Homeग्रामीणअखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने जनतेच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरात आंदोलन.

अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने जनतेच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरात आंदोलन.

               

प्रतिनिधी :- अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने जनतेच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले.

            मागील दोन-तीन महिन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.कच्च्या तेलाच्या किमती घटलेल्या असतानाही तेल कंपन्या पेट्रोल डिझेलचे भाव वाढवतच आहेत. त्यामुळे एकीकडे हाताला काम नाही, EMI भरायला पैसे नाहीत,  लोकांचा खाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरीही सलग अकरा दिवसांपासून भाववाढ सुरू आहे.त्यामुळे आधीच होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून जळजळीत चटका दिला आहे.महाराष्ट्रातील इंधन भाववाढीने संपूर्ण भारतीय उपखंडात उच्चांक गाठला आहे, असे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी माळी म्हणाले.

          तर पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे महागाई वाढते, आर्थिक विकास क्षीण होतो असा अनुभव असतानाही केंद्रातील भारतीय जनता पार्टी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारची या आंदोलनावेळी जी सोयीस्कर निष्क्रियता दिसत आहे ती निषेधार्ह आहे, असे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड दिलदार मुजावर म्हणाले.

           यावेळी प्रत्येक कुटुंबाला कोरोना रिलीफ फंड म्हणून दहा हजार रुपये द्यावेत,  वैद्यकीय शिक्षणामध्ये देशभरातील ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करावे, पेट्रोल डिझेल भाववाढ मागे घ्यावी, सर्व खाजगी हॉस्पिटलचे राष्ट्रीयीकरण करावे व खाजगी हॉस्पिटल्स सरकारने आपल्या ताब्यात घ्यावीत, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे, सर्व तरुणांना ३६५ दिवसाच्या रोजगाराची हमी देणारा कायदा लागू करावा, विज बिल,फोन बिल व कर्जाचे हप्ते तीन महिन्यांसाठी रद्द करावेत, कर्ज हप्त्यांचे व्याज आकारू नये आदी मागण्या करण्यात आल्या.

         या आंदोलनात उत्कर्ष पोवार,  रियाज काजी, प्रशांत पोवार, इर्शाद फरास, मिनाज काजी, राजू पोवार, हिदायत मुजावर, आशपाक जमादार, मुश्ताक शेख, जावेद शेख, तौसिफ मुल्लाणी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय