Friday, May 17, 2024
Homeग्रामीणआयकर लागू नसलेल्यांना दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या; सिटूची केंद्र...

आयकर लागू नसलेल्यांना दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या; सिटूची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी. अन्यथा ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा.

प्रतिनिधी :- आयकर लागू नसलेल्यांना  दरमहा १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या, अशी मागणी सेंटर ऑफ ट्रेंड युनियन(सिटू) ने केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

          मागणी मान्य न झाल्यास जनआंदोलन उभारले जाणार असून ३ जुलै २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर नियम पाळून व शारीरिक अंतर ठेऊन गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.

         मोदी सरकारने २४ मार्च पासून लॉक-डाउन लागू केल्यानंतर सर्व उद्योग, व्यवसाय, वाहतूक बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे उत्पन्न बुडाले, कामगारांचा रोजगार गेला, व व्यवसाय बंद झाले, छोटे-मोठे कारागीर बेरोजगार झाले. विशेषता असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना व गोरगरिबांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली केंद्र सरकार व राज्य सरकारांनी ही टाळेबंदी लागू केली आहे. परंतु टाळेबंदी लागू केल्यानंतर नागरिकांना जगविण्यासाठी किमान नियोजन केले पाहिजे अशी तरतूद कायद्यात असतानासुद्धा केंद्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतले नाहीत. जनधन खात्यावर ५०० रुपये, रेशन दुकानातून ५ किलो धान्य यासारख्या थातूरमातूर योजना जाहीर केल्या असल्याचे सिटूने म्हटले आहे.

           आयकर लागू नसलेल्या, आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे सहा महिने आर्थिक सहाय्य करावे, दर मानसी दरमहा दहा किलो धान्य  देण्यात यावे, प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात यावी, मनरेगाची कामे किमान २०० दिवस देण्यात यावीत व किमान वेतन ६०० रुपये प्रतिदिन करण्यात यावे. शहरातही मनरेगाची कामे सुरू करावीत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्यात यावे, कामगारांना लॉकडाऊन काळाचे वेतन अदा करण्यात यावे, तसेच सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे  केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत कामगार कायदे रद्द करण्याचे निर्णय मागे घ्यावेत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावेत व खरीप पिकासाठी त्यांना सहाय्य करावे, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

           केंद्र सरकारच्या या असंवेदनशीलतेमुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठे संकट निर्माण झाले आहे व देशातील नागरिकांची, महिलांची, मुलांची उपासमार होते असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सिटू सर्व कामगार संघटनांनी ३ जुलै २०२० रोजी देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला असून आंदोलनास शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्या संघटनांनीही पाठिंबा दिला असल्याची माहिती सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय