Friday, May 17, 2024
Homeग्रामीणभारताचा प्राण आहे संविधान- सुनिल स्वामी

भारताचा प्राण आहे संविधान- सुनिल स्वामी

प्रतिनिधी :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज “भारतीय संविधान” या विषयी सुनील स्वामी यांनी मार्गदर्शन केले.

            देशात राजेशाही होती जात पंथ रूढी परंपरा मनस्मृती, भेदभाव, सामाजिक विषमता असताना सुखाचं राज्य आणण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. या देशातील लोकांना मताचा अधिकार दिला, देशातील लोकांना समान पद दिले ते संविधानाने त्यामुळे संविधान हे भारताचे प्राण आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी सुनील स्वामी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

          भारत अनेक धर्माचा देश आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार दिला आहे विश्वास श्रद्धा उपासना सर्वाना दिलेले आहे. सर्वाना आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. हे करीत असताना भारताची एकात्मता ही संपूर्ण देशाला सुपरिचित आहे. त्यामुळे आपला देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो. 

          संविधानाने शिक्षणाचा हक्क दिला, संविधानाने मूलभूतहक्क व कर्तव्य  दिले आहे. ते हक्क कर्तव्य आचरणात आणले पाहिजे. त्याचबरोबर सविधानाचे रक्षण करणे हे ही आपले कर्तव्य आहे. आपल्या सविधानाचे पहिल पान आपल्याला हे सांगिते की सविधानाचे रक्षण करणे हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. देशातील लोकशाही संविधान अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी लोकशाही मध्ये प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार दिला आहे. या देशाच भविष्य हे युवकांवर अवलंबून आहे.यासाठी तत्परतेने सजग राहून या सविधानाचे रक्षण केले पाहिजे. एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. 

          आपले भारताचे संविधान हा आपल्या देशाचा आरसा आहे, ज्यामध्ये आपण स्वतःला पाहून आपण आपल्या देशाचा कारभार चालवतो. व समाजातील प्रत्येक व्यक्तीला भेदभाव विरहित आणि स्वातंत्र्य-समता-बंधुता या नितीमूल्यांवर आधारित जगण्यासाठी प्रेरीत करतोय, असे स्वामी म्हणाले.

           या व्याख्यानात एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, एसएफआय चे मार्गदर्शक किशोर झेंडेकर, पूजा कांबळे, पल्लवी मासन, गणेश भोईटे, राजेश्वरी पडाल, दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, प्रशांत आडम, राहुल भैसे, लक्ष्मी रच्चा, मुस्तफा बागवान, जयकुमार सोनकांबळे, स्नेहलता दाभाडे, विजय एडके, शकील बिराजदार आदीसह विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय