जुन्नर /आनंद कांबळे : आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले यांचे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी व आदिवासी समाजासाठी विशेष योगदान आहे. विशेषता आदिवासी समुदायासाठी त्यांनी केलेले आत्मभानाचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण होते. त्यांनी दिलेले आदिवासी प्रश्नांवरचे लढे हे सतत प्रेरणा देणारे ठरावे यासाठी त्यांच्या नावाने मागील तीन वर्षापासून स्मृती पुरस्कार अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने नियमित दिला जात आहे.Ghodegaon
या वर्षाचा आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले स्मृती पुरस्कार हा माजी पंचायत समिती उपसभापती निसर्गवासी तुकाराम भोकटे व सामाजिक कार्यकर्त्या एड.शारदा वाडेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
घोडेगाव (Ghodegaon)येथील शंतनू मंगल कार्यालय येथे येत्या रविवारी, दुपारी ११ ते ३ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी नेते व किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ.डॉ.अजित नवले हे जनतेची चळवळ कशासाठी व कोणासाठी ? या विषयावर मांडणी करणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मारुती रढे हे असणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.प्रमिला बांबळे या असणार आहेत. यावेळी किसान सभेचे पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेची आंबेगाव तालुका समितीने केले आहे.
किसान सभा आंबेगाव तालुका समितीचे नंदा मोरमारे, कृष्णा वडेकर, बाळू काठे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, कमल बांबळे, सुभाष भोकटे, दीपक रढे, अर्जुन काळे, सुभाष पारधी, पुंडलिक असवले हे या कार्यक्रमाचे संयोजन करत आहे.
Ghodegaon
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी