Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सत्तारुढ पक्ष आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना अंतरिम जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Manish Sisodia)

आबकारी धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात सिसोदिया तुरूंगात आहेत. जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी सिसोदियांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटता येईल, असे स्पष्ट करीत यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले. अर्जावर सुनावणी पुर्ण करीत न्यायालयाने ३ जूनला निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने सोमवारी हा निकाल सुनावला.

काही दिवसांपूर्वी न्यायालयाने सिसोदियांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत घरी जाण्यासाठी ८ तासांचा अंतरिम जामीन दिला होता. पंरतु, त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सिसोदियांना त्यांना भेटता आले नव्हते. दरम्यान पोलीस अधिकारी सिसोदियांना त्यांच्या घरी अथवा रुग्णालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत घेवून जावू शकतात, असे आदेश न्यायालयाने सुनावला.

आबकारी धोरणातील घोटाळ्याप्रकरणात अटक

२६ फेब्रुवारीला आबकारी धोरणातील घोटाळ्याप्रकरणात सिसोदियांना सीबीआयने अटक केली होती. उच्च न्यायालयाने ३० मे रोजी सीबीआयच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. ९ मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) सिसोदियांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आजारी पत्नीची सुश्रुषा करण्यासाठी सिसोदियांनी न्यायालयाकडून जामीन मागितला होता.


परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती



संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय