Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयYouTube channel Ban : ‘बोलता हिंदुस्थान’ नंतर आणखी एका आंबेडकरवादी चॅनेलला बॅन...

YouTube channel Ban : ‘बोलता हिंदुस्थान’ नंतर आणखी एका आंबेडकरवादी चॅनेलला बॅन करण्याचे निर्देश

YouTube channel Ban : यूट्यूबवरून ‘बोलता हिंदुस्थान’चे (Bolta Hindusthan) चॅनल ४ एप्रिल रोजी काढून टाकल्यानंतर आता आणखी एक आंबेडकरवादी चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) यूट्यूबला दिले आहेत. लोकसभेच्या निवडणूकीच्या दरम्यानच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहे.

बोलता हिंदुस्थान (Bolta Hindusthan) नंतर आता नॅशनल दस्तक (National Dastak) या युट्यूब चॅनेलला युट्यूबने ३ एप्रिल रोजी नोटीस पाठवली आहे. (YouTube channel Ban) नॅशनल दस्तकने सोशल मीडिया एक्सवर ही माहिती दिली. या चॅनेलच्या मालकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, YouTube ने उघड केले आहे की त्यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅशनल दस्तकने (National Dastak) सोशल मीडिया एक्सवर लिहले आहे की, नॅशनल दस्तक चॅनेल सरकारला बंद करायचे आहे. YouTube ने ३ एप्रिल रोजी नोटीस पाठवली होती. आर्टिकल १९ ला देखील नोटीस आहे. हे सर्व आचारसंहितेमध्ये घडत आहे. लाखो वर्तमानपत्रे आणि टीव्ही वृत्तवाहिन्या चालू आहेत. बहुजनांच्या नॅशनल दस्तकची एवढी भीती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, सोमवार, ८ एप्रिल रोजी Google ने मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, चॅनेलवर बंदी का घातली जात आहे हे आम्ही स्पष्ट करू शकत नाही कारण सरकारने ते कारण गोपनीय घोषित केले आहे.

नॅशनल दस्तक हा ‘ऑनलाइन मीडिया’ दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासलेले लोक, महिला आणि शेतकऱ्यांच्या बातम्या देते. नॅशनल दस्तकचे YouTube चॅनेलवर ९४.२ लाखहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. सरकार कोणतेही स्पष्टीकरण न देता, दुर्लक्षित लोकांच्या प्रश्नांवर वार्तांकन करणाऱ्या आणि चालवणाऱ्या स्वतंत्र माध्यमांना लक्ष्य आणि सेन्सॉर का करत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

संबंधित लेख

लोकप्रिय