Harishchandragad : हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून मुंबईतील एका पर्यटक तरूणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. मृत तरुणीचं नाव अवनी मावजी भानुशाली (वय 22 रा. घाटोकोपर, मुंबई) असल्याचं तपासात समोर आलं आहे.
मृत तरुणीनं सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. या सुसाईड नोटमध्ये आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. मात्र तिने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. हा घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, घाटकोपर येथील अवनी भानुशाली ही रविवारी हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) पर्यटनासाठी आली होती. ती कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून वाटाड्याला सोबत घेत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोकणकड्यावर पोहोचली होती. त्यानंतर तिने आपली बॅग तिथेच ठेवून सुसाईड नोट लिहिल्यानंतर स्वत:ला कड्याच्या उजव्या बाजूनं 1400 फूट खोल दरीत झोकून दिलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाटाड्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर राजूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, पोहेकॉ व्ही. के. मुंढे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून खोल दरीतून युवतीचा मृतदेह बाहेर काढला. राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी राजूर गाठले. तरुणीचे वडील मावजी जेठालाल भानुशाली (वय, ५२) यांनी राजूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अवनी मावजी भानुशाली ही काहीतरी तणावातून हरिश्चंद्रगडावर आली होती.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
अवनीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली आहे, या सुसाईड नोटमध्ये तीने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. ‘आई, बाबा मला माफ करा, मला कोणीही मदत करू शकलं नाही. मी खूप विचार करून हा निर्णय घेत आहे. त्याबद्दल मला माफ करा. मला खूप काही सांगायचं होतं पण ते मी सांगू शकत नाही. मला शब्दात व्यक्त करता येत नाही. मी प्रार्थना करते असं पाऊल कुणीच उचलू नका’ असं भावनिक पत्र तिनं आपल्या आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलं. त्यानंतर तिने आत्महत्या केली.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू
मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का
मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा