तांदुळवाडी : येथील धममज्योती बुद्धविहार तांदूळवाडी मधील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तर्फे मुख्याधिकारी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी कमिटीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धम्मज्योती बुद्धविहार परिसरातील विविध विकासकामांसाठी निवेदन देण्यात आहे. Bhim jayanti
१ बुद्धविहार परिसरात विद्युत रोषणाई करण्यात यावी.
२ बुद्धविहार ची रंगरंगोटी करण्यात यावी.
३ शौचालय परिसरात पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात यावे.
४ धम्मज्योती बुद्धविहार परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणूक रथासाठी मार्गावर असणाऱ्या अतिरिक्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या उद्यान विभागामार्फत तोडण्यासाठी चे निवेदन देण्यात आले.
५ पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या खोदकामाच्या मुळे रस्त्यावर आलेला ओबडधोबडपणा घालवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता सपाट करण्यासाठीचा प्रस्ताव नगरपालिकेला देण्यात आला.
६ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 वृक्ष लागवड करण्यासाठीचा व ती वृक्ष नगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. Bhim jayanti
बारामती नगर परिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी महेशजी रोकडे साहेब यांना समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनावरती सकारात्मक प्रतिसाद देत विविध मागण्या मान्य करून काही कामे धम्मज्योती बुद्धविहार परिसरामध्ये प्रत्यक्ष सुरू आहेत.
1 ) धम्म ज्योती बुद्ध विहारा समोर रोशनी साठी हायमास्ट बसवण्याचे काम सुरू आहे.
2) धम्म ज्योती बुद्ध विहारा मध्ये नवीन थ्री फेज लाईटचे जोडणीचे काम सुरू आहे त्यामध्ये लाईट कनेक्शन सोबतच नवीन पंखे व ट्यूबलाइट्स बसवण्यात आलेले आहेत.
3) धम्मज्योती बुद्ध विहारास रंगरंगोटीचे काम हे सुरू होत आहे.
4) धम्मज्योती बुद्धविहारांमध्ये असणाऱ्या वाचनालयासाठी बारामती नगर परिषदेमार्फत 25 हजार रुपये किमतीची पुस्तके मंजूर झालेले असून लवकरच ती ग्रंथालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत.
सदर निवेदन देताना कमिटीचे अध्यक्ष भीमराव सरोदे, उपाध्यक्ष रत्नदीप सरोदे, सचिव ॲड. योगेश सरोदे, कार्याध्यक्ष करण पानसरे, खजिनदार विजय कांबळे, जीवन सरोदे, हरीश सरोदे, ऋषिकेश सरोदे, साहिल सरोदे, मयूर सरोदे, उपस्थित होते.
हे ही वाचा :
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू