राजूर कॉलरी : ” शेतकऱ्यांना बी, बियाणे, शेतसारा कमी ठेवणे, दुष्काळात शेत सारा माफ करणे, शेतमालाचा देठा लाही हात न लावण्याचे फर्मान काढणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मुसक्या बांधून कठोर दंड देणे, गुलामांचा व्यापारावर बंदी म्हणजेच वेठबिगार, कष्टकऱ्यांचे शोषण बंद करणे, सर्व धर्मांना समान लेखणे आणि आपल्या सैन्यात बरोबरीचे स्थान देणे, कारभारात सामावून घेणे हे या छत्रपती शिवरायांचा कार्यामुळे रयतेला हे राज्य स्वतःचे आहे असे वाटायचे त्यामुळे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असायचे, परंतु आज लोकशाही मध्ये निवडून दिलेले राज्यकर्ते मात्र जातीभेद, धर्मांधता, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालने, त्यांच्यावर कार्यवाही न करणे, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदे करणे असे दुष्कृत्य करताना दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजचा लोकशाही लाही लाजवतील असे महान कार्य असल्याने आज लोकशाहीत सुद्धा त्यांचा जयजयकार होतो आहे.” असा सूर काल राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथी प्रमाणे केल्या गेलेल्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या वक्त्यांनी काढला.
या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यवतमाळ जि. म. बँक लि. चे उपाध्यक्ष संजय देरकर तर अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अजिंक्य शेंडे, मा. उपसरपंच अशोक भगत, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, मा. सरपंच प्रणिता असलम, ग्रा. प. सदस्य अमर तीतरे, बबिता सिंग, रेहाना सिद्दीकी,ओम चिमुरकर व पत्रकार अजय कंडेवार उपस्थित होते. या वेळेस संजय देरकर, संघदीप भगत, कुमार मोहरमपुरी, अजय कंडेवार यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा व त्यांचा जीवनावर वक्तव्य असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार लावण्या मारोती पूनवटकर, द्वितीय शाश्वत फुलझेले, तृतीय प्रतीक अमर सोलंकी तर प्रोत्साहन म्हणून अंशिका नंदकिशोर लोहकरे व लावण्या न. लोहकरे यांनी पटकाविले.
या कार्यक्रमात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रज्ञा पूनवटकर यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळेस सुमधुर गीत गायन व क्लासिकल नृत्याचा सूर संगीतमय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन सन्मान स्त्री शक्तीचा उपाध्यक्ष दिशा अमृत फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवा सेना शाखा प्रमुख अमृत फुलझेले, अभिजित सुरसे, सिनू दासारी, प्रफुल पाटील, आकाश जोगदंडे, बंडू मोडक, आकाश बोलगमवार, सचिन भालेराव, नामदेव व अन्य वॉर्ड क्रं. येथील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
हे ही वाचा :
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर
तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार