Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : रिक्षा, टॅक्सी चालक कल्‍याणकारी महामंडळ : बाबा कांबळे यांचा सत्कार

PCMC : रिक्षा, टॅक्सी चालक कल्‍याणकारी महामंडळ : बाबा कांबळे यांचा सत्कार

रिक्षा चालक, कष्टकऱ्यांना न्‍याय देणे हे माझे कर्तव्‍य : बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विविध आंदोलने, निवेदने देऊन रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या कल्‍याणकारी मंडळासाठी राज्यसरकार कडे पाठपुरावा करत यश मिळवून दिले. याबद्दल ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक बाबा कांबळे यांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील चालक मालकांनी सन्‍मान केला. PCMC News

पिंपरी येथील बाबा कांबळे यांच्‍या कार्यालयात भेट घेऊन हा सन्‍मान करण्यात येत आहे. या सन्‍मानाला उत्‍तर देताना बाबा कांबळे म्‍हणाले की, सर्वसामान्‍य कष्टकरी,रिक्षा चालकांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्‍यामुळे कल्‍याणकारी मंडळासाठी झालेला निर्णय हे माझ्या लढ्याचे यश असले तरी त्‍यासाठी पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्‍य असल्‍याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी व्‍यक्‍त केले. PCMC News

या वेळी लोणावळा येथील वरिष्ठ नेते बाबु शेख लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या भेटी घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. राज्‍य सरकारने  कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्‍याचा पहिला भाग म्‍हणून मंडळ स्‍थापन करण्यासाठी तब्‍बल ५० कोटी रुपये निधी देखील मंजूर केला आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

संबंधित लेख

लोकप्रिय