पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,पेठ क्र. १६, राजे शिवाजीनगर चिखली प्राधिकरण येथे कृष्ण जन्मोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. Krishna Janma ceremony at Chikhli Pradikashan
यावेळी महिलांनी जो बाळा जो जो रे जो आदी पाळणा गीते गायली. कृष्ण जन्माच्या जय कन्हैया लाल की..घोषणा देत श्रीकृष्णाची आळवणी करत भाविकांनी कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष महेश देविदास पोळ, विश्वनाथ मोहन पवार, संजय कोंडीबा मामडगे, रामेश्वर बंडू निकम, कुलदीप सुदाम राठोड, सोनाली बिर्ले, मेघा पोळ, संजीवनी शिंदे, रेश्मा भोंग सह भजनी मंडळ व सर्व सेवेकरी महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उत्सवात उपस्थित होते.