इगतपुरी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या गुणवंताचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हया गुणवंत पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. या गुणवंत पुरस्काराची घोषणा कार्यक्रमाचे आयोजक, निमंत्रक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केली आहे. (Igatpuri)
आदर्श जनसेवक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देशभरात आदर्श गाव म्हणुन राष्ट्रपती व पंतप्रधान यांनीही नावाजलेल्या मोडाळे गावच्या विकासाचे शिल्पकार तथा माजी जि.प. सदस्य गोरख बोडके यांना जाहिर करण्यात आला आहे.
महर्षी दिवंगत आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांचे स्मृती निमित्ताने दिला जाणारा यंदाचा पुरस्कार शोषित, वंचित व असंघटीत कामगार, योजना कर्मचारी आशा गट प्रवर्तक कष्टकर्याचें नेते कॉ.राजु देसले, आयटक राज्य सचिव नाशिक यांना जाहिर करण्यात आला आहे.
सहकार महर्षी आमदार स्व. मुळचंद भाई गोठी यांचे स्मृती लिहिली दिला जाणारा पुरस्कार सहकार नेते तथा श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे यांना जाहिर झाला आहे.
वै.ह.भ.प.किसन महाराज काजळे, नांदुरवैदय यांचे स्मृती निमित्ताने दिला जाणारा किर्तन केसरी पुरस्कार ह.भ.प. नामदेव महाराज डोळस, इन नांदुरवैदय यांना जाहिर झाला आहे.
स्व.पत्रकार रामदास वारुंगसे यांचे स्मृती निमित्ताने दिला जाणारा पुरस्कार घोटी येथील दै. सकाळ चे पत्रकार गोपाळ शिंदे यांना जाहिर झाला आहे. आदर्श धार्मिक देवस्थान व्यवस्थापन पुरस्कार नाशिक येथील कालिका मंदिर देवस्थानचे केशवराव पाटिल यांना जाहिर झाला आहे.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ.महेंद्र शिरसाट, घोटी यांना आरोग्यदाता हा तर धारगाव आदिवसी भागात वैदयकिय सेवा देणारे डॉ.जयवंत जगताप यांना आरोग्य दुत हा पुरस्कार जाहिर झाला आहे.तर शासकिय सेवेच्या माध्यमातुन तत्पर सेवा देणारे रमेश आवारी यांना आदर्श आरोग्यसेवक पुरस्कार जाहिर झाला आहे.
स्व.कवी.स्वामी गायकर यांचे स्मृती निमित्ताने दिला जाणारा पुरस्कार सुप्रसिध्द कवी नंदकिशोर ठोंबरे यांना जाहिर झाला आहे. आदर्श युवा नेता पुरस्कार तुकाराम वारघडे यांना जाहिर झाला आहे. (Igatpuri)
आदर्श साहित्यीक संस्थेचा महाराष्ट्र भुषण साहित्य संस्था पुरस्कार प्रतिभा साहित्य संघ अकोट, जि.अकोला याना जाहिर झाला आहे. साहित्य भुषण पुरस्कार रायगड येथील सुप्रसिध्द लेखक तानाजी धरणे यांना जाहिर झाला आहे.
साहित्य क्षेत्रासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे सुर्योदय साहित्य मंडळ जळगाव चे संस्थापक अध्यक्ष सतीश जैन, जेष्ठ साहित्यिका सुशिला संकलेचा व ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांना जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे. (Igatpuri)
आदर्श गाव हा पुरस्कार इतर गावासाठी आदर्श ठरणाऱ्या मोडाळे, शिरसाटे व आवळी दुमाला या गावानां जाहिर झाला आहे.आदर्श कामगार पुरस्कार हा महिंद्रा कंपनी ईगतपुरी येथील कामगार प्रदिप पाटिल नाशिक यांना जाहिर झाला आहे. आदर्श माध्यमिक विदयालय हा पुरस्कार ज्ञानदा माध्यमिक विदयालय मोडाळे विदयालयास जाहिर झाला आहे.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आवळी दुमाला व मोडाळे या दोन्ही गावांचा कायाकल्प करण्याची किमया करणारे ग्रामसेवक हनुमान दराडे यांना जाहिर झाला आहे. आदर्श सरपंच हा पुरस्कार निनावीचे सरपंच गणेश टोचे व धामणगाव चे सरपंच शिवाजी गाढवे यांना जाहिर झाला आहे. ज्योतिषाचार्य पुरस्कार नाशिक येथील सुप्रसिध्द ज्योतिषी नरेन्द्र धारणे यांना जाहिर झाला आहे.
या गुणवंत पुरस्काराचा वितरण सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनात माजी आमदार हेंमत टकले, संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचेसह मान्यवराचें हस्ते मोडाळे ता. इगतपुरी येथे सोम.दि.३०/१२/२४ रोजी सकाळी ८ ते सायं.६ वा.होणार आहे अशी माहिती आयोजक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी दिली आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ