Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC चिखली मोशी शिवरोड पदपथावरील झाडांची अज्ञाताकडून बेकायदेशीर वृक्षतोड : नागरिकांची कारवाईची...

PCMC चिखली मोशी शिवरोड पदपथावरील झाडांची अज्ञाताकडून बेकायदेशीर वृक्षतोड : नागरिकांची कारवाईची मागणी

मनपा उद्यान विभागाकडून चौकशी सुरू

शिवरोड मोशी परिसरात सीसीटीव्ही बसवा – आश्विनी जाधव

झाडे तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा – सोनम जांभूळकर

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: चिखली,मोशी जाधववाडी शिवरोड येथील पदपथावर संवर्धन केलेली पालिकेची झाडे गुरुवारी मध्यरात्री (दि.२६) रात्री कुणी अज्ञात व्यक्तींनी तोडली आहेत. ही सर्व झाडे मागील चार वर्षात मनपाच्या सहकार्याने येथील दुकानदारांनी काळजीपूर्वक वाढवली होती.चांगली वाढलेली येथील प्रशस्त अर्बन स्ट्रीट व परिसराचे सौंदर्य वाढवणारी ही झाडे तोडल्याचे सकाळी लक्षात आल्यावर येथील जागरूक नागरिक,दुकानदार यांनी मनपाच्या उद्यान विभागाला कळवले. चांगली वाढलेली एकूण ८ झाडे सहा फुटावर तोडून त्याची रातोरात विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.



उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी तातडीने शिवरोड येथील तोडलेल्या झाडांचे पंचनामे सुरू केले आहेत.याठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल ,असे मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी सांगितले.


शिवरोड परिसरात सार्वजनिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा : अश्विनी जाधव


येथील माजी नगरसेविका आश्विनीताई जाधव यांनी झाडे तोडणाऱ्यांची निंदा केली आहे. शिवरोड येथे प्रशस्त अर्बन स्ट्रीट विकसित करण्यात आलेले आहेत.अतिशय मोठ्या रहदारीच्या या परिसरात नागरीकांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही मनपाने तातडीने बसवावेत,अशी मागणी अश्विनीताई जाधव यांनी केली आहे


झाडे तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा-सोनम जांभूळकर

गजबजलेल्या शिव रस्त्यावरील अपरात्री झाडे तोडणाऱ्यांचा येथील सामाजिक कार्यकर्त्या सोनम जांभूळकर यांनी निषेध केला आहे,येथील पदपथावरील झाडे खूप उंच वाढलेली होती.त्याची छाटणी करणाऱ्यांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई मनपाच्या उद्यान विभागाने करावी,अशी मागणी सोनम जांभुळकर यांनी केली आहे


पदपथावरील झाडे वारंवार तोडली जातात : कैलास नलावडे


येथील हॉटेल व्यावसायिक कैलास नलावडे यांनी सांगितले की, येथील पदपथावरील झाडे उंच वाढल्यावर कोणीतरी रात्री बेरात्री झाडे तोडून उंची कमी करतात.असे प्रकार वारंवार दरवर्षी होतात, आणि येथील बेकायदेशीरपणे अपरात्री झाडांची छाटणी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून झाडांचे रक्षण केले पाहिजे.

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख

लोकप्रिय