नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सचे (Indigo Airlines) ‘शारजाहुन हैदराबादला (Sharjah-Hyderabad) जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानातील कराची (Pakistan Karachi) इथं इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. तांत्रिक बिघाडीमुळं हे विमान कराचीत उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारी म्हणून विमान कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं आणि क्रू मेंबर्सनी (Crew members) विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. हे विमान शारजाहून हैदराबादला जात होतं. या दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. आता विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे.
दरम्यान, पाच जुलै रोजी देखील स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने कराचीत एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते. तर तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. इंजिनला कंपन आल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
हेही वाचा
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ‘यांनी’ केली मागणी
शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरावर झाला ‘हा’ निर्णय
जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके
पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या – किसान सभा
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी
MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख