Gukesh Dommaraju : भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश ने अवघ्या 18व्या वर्षी इतिहास रचत फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 जिंकली. चीनच्या विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेन यांना 7.5-6.5 ने पराभूत करत त्यांनी हा प्रतिष्ठित किताब आपल्या नावावर केला. विश्वनाथन आनंद यांच्या नंतर हा किताब जिंकणारे ते दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहेत.
गुकेशच्या यशामागे केवळ त्यांचा कठोर परिश्रम नव्हे, तर त्यांच्या पालकांच्या त्यागाची देखील मोठी भूमिका आहे. त्यांच्या वडिलांनी आणि आईने आपल्या करिअरला ब्रेक देत मुलाच्या स्वप्नांसाठी सर्वस्व समर्पित केले.
Dommaraju Gukesh ची संघर्षमय प्रवासाची कहाणी
गुकेशने सातव्या वर्षी बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली आणि कमी कालावधीतच जागतिक पातळीवर चमकदार यश मिळवले. मात्र, या यशाचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे वडील रजनीकांत हे ईएनटी सर्जन असून, आई पद्मा या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. 2017-18 च्या काळात रजनीकांत यांनी आपले वैद्यकीय काम थांबवून गुकेशच्या प्रशिक्षणासाठी पूर्ण वेळ दिला. त्या काळात त्यांनी कमी बजेटमध्ये जागतिक पातळीवर गुकेशला स्पर्धांचा अनुभव मिळवून दिला.
आई पद्मा यांनी मात्र आर्थिक जबाबदारी उचलत घराचा खर्च चालवला. कधी कधी पालकांचा दीर्घ काळ एकमेकांना भेटण्याचा योगही आला नाही. गुकेशच्या यशात त्यांच्या प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांचाही मोठा वाटा आहे.
भावनिक क्षण आणि कुटुंबाचा अभिमान
डिंग लिरेन यांच्यावर विजय मिळवल्यानंतर गुकेशने आपल्या आईशी फोनवर बोलताना भावना व्यक्त केल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यांच्या मेहनतीची कहाणी लोकांना प्रेरणा देत आहे.
डी. गुकेश ने त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर भारताचेही नाव उज्ज्वल केले आहे. 12 वर्षे, 7 महिने आणि 17 दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावून त्यांनी बुद्धीबळ इतिहासात आपली वेगळी छाप सोडली.
भारताच्या यशस्वी खेळाडूंच्या यादीतील नवे तेजस्वी नाव
गुकेशच्या यशामुळे भारताच्या बुद्धीबळ क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांचे कष्ट, पालकांचा त्याग आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ते भविष्यातील आदर्श खेळाडू ठरले आहेत.


हे ही वाचा :
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर
बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती