पिंपरी चिंचवड : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे.
आमदार लांडगे यांनी म्हटले, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याच वेळी देशातील भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते.
भाजपने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी, अशी मागणी सातत्याने केली होती. याचा उल्लेख करून आमदार महेश लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात आता केंद्र राज्य सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. असे आमदार लांडगे म्हणाले.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर
हेही वाचा :
भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी