जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर (Junnar)न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या आवारात असलेल्या १५० वर्ष असलेल्या जुन्या वडाच्या झाडाची फांदी डोक्यावर व अंगावर कोसळल्याने उंब्रज नंबर दोन येथील चंद्रकांत किसन हांडे (वय ५५) या व्यक्तीचा मृत्यू झाला. अंगावर फांदी कोसळल्याने या व्यक्तीस उपचारासाठी जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात नेले असतान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
चंद्रकांत किसन हांडे हे वाटपपत्राच्या कामासाठी जुन्नर न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या बाहेर असलेल्या ई फायलिंग केंद्राच्या लगत असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर ते त्यांच्या नातलगांसमवेत उभे होते. याच वेळी २०ते २५फूट लांबीची व जाड फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. यावेळी त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक बाजूला झाल्याने ते बचावले. परंतु किसन हांडे यांच्या डोक्यावर फांदी पडल्याने त्यांचे डोके सिमेंटच्या बाकड्यावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. न्यायालयात असलेल्या वकिल बांधवांनी तातडीने हांडे यांना रुग्णालयात नेले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जुन्नर शहरात असलेल्या जुन्या सिटी फोर्टच्या आवारात वडाचे जवळपास १५० वर्षांपूर्वीचे व १५ते २०फूट व्यासाचे झाड आहे. न्यायालयाची नवीन इमारत बांधताना या ठिकाणी असलेले वडाच्या झाडाचे नुकसान न करता इमारत बांधण्यात आली होती. सद्यस्थितीत या झाडाच्या फांद्यांचा विस्तार न्यायालयाच्या इमारतीच्या वर गेलेला आहे. या फांद्या देखील धोकादायक अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला झाडाच्या धोकादायक फांद्या काढून टाकण्याच्या मागणी केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने हांडे यांचा बळी गेल्याचे संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.
रस्त्याच्या कडेला असणारी झाडे तोडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्थपूर्ण रुची असते परंतु न्यायालयाच्या आवारात रोज हजारो नागरिक येत असतात त्यांच्या जीविताकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. चौकटीसाठी मजकूर- प्रत्येक शुक्रवारी सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी वकील वर्ग व पक्षकार खेड येथील सत्र न्यायालयात असतात. परिणामी प्रत्येक शुक्रवारी जुन्नर न्यायालयात वकील व पक्षकार यांची गर्दी कमी असते. झाडाखाली मोठ्या प्रमाणात नागरिक व पक्षकार बसलेले असतात. परंतु शुक्रवार असल्याने गर्दी कमी असल्याने दुर्घटनेची तीव्रता कमी झाली.
Junnar
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी